तिलारी घाटात अपघातग्रस्त गाडीला धडक बसून दुसरा अपघात

banner 468x60

तिलारी घाटात शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हुबळी कर्नाटक हुन गोव्याच्या दिशेने प्रवास करताना मालवाहतूक पिकअप गाडी जयकर पॉईंट जवळील उतारावर आली असता पिकअप गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून दोन दिवसांपूर्वी अपघात झालेल्या रस्त्यावरच्या दुसऱ्या वाहनालाच धडक बसून अपघात झाला आहे.

banner 728x90

या अपघातात गाडीतील चालक व त्याचा साथीदार सुखरूप असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दररोज होणारे अपघात व घाट रस्त्याची काही ठिकाणी झालेली पडझड व दुरवस्था तसेच जयकर पॉईंट जवळील उतारावर मोठ्या प्रमाणात खचलेला रस्ता यामुळे घाटातील अवघड वाहतुक बंद करण्यात आली आहे.मात्र अधूनमधून अवजड वाहनांचा घाटरस्त्यात अपघात होत असतात याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *