आंजणारी पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरु

banner 468x60

लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती.

banner 728x90

अखेर सायंकाळी 5:45 नंतर आंजणारी पुलावरील वाहतूक सुरु झाली आहे. लांजा तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.पुराचे पाणी शेतात शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज दुपारी साडेतीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता .

पुल बंद झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता आंजणारी पुलावरील वाहतूक सुरु झाली आहे.

banner 728x90