खेड : वेरळ येथून बेपत्ता तरुणाचा जगबुडी नदीत आढळला मृतदेह

banner 468x60

खेड तालुक्यातील वेरळ येथून बुधवारी बेपत्ता झालेल्या तरुणाचा दोन दिवसांनी शुक्रवारी (दि.१२) जगबुडी नदी पात्रात मृतदेह आढळून आला.

banner 728x90

पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढला असून शवविच्छेदन अहवालासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे पाठवला आहे.

खेड तालुक्यातील वेरळ येथून बुधवारी (दि.१०) सकाळी ६ वाजल्यापासून तुषार मनोहर त्रिपाठी हा तरुण घरात कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध त्याचे नातेवाईक व मित्र घेत होते. शुक्रवारी (दि.१२) जगबुडी नदी पात्रात भोस्ते पूलनजीक दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह तरंगत आल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यांनंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर खेडचे पोलिस निरीक्षक नितीन भोयर पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. यावेळी स्थानिक विसर्जन कट्टा या टीमचे सदस्य गणेश खेडेकर व सहकारी यांनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात उतरून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना सहकार्य केलं.

नदी पात्रात सापडलेला मृतदेह हा वेरळ येथून बेपत्ता झालेल्या तुषार त्रिपाठी या तरुणाचा आल्याची बाब उघड झाली असून त्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *