सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी ५० हजाराची लाच घेणाऱ्या रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
विनायक रामचंद्र भोवड, (वय 57 वर्षे, रा. ‘स्वामी’ त्रिविक्रम नगर, कसोप सडा, ता. जि. रत्नागिरी) असे लाचेची मागणी करणाऱ्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक कार्रयालयातील मुख्य लिपिकाचे नाव आहे.
येथील ५३ वर्षीय तक्रारदार यांचे सावकारी लायसन्सचे काम करून देण्यासाठी आरोपी विनायक रामचंद्र भोवड, याने दि. 26 जुन 2024 रोजी तक्रारदार यांचेकडे स्वतःसाठी व DDR ऑफिसला देण्यासाठी असे सांगत 50,000/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती.
तक्रारदाराने ही मागणी मान्य केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे केलेली लाच रक्कम 50,000/- रुपये आज गुरुवारी 11 जुलै 2024 रोजी कार्यालयात देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार याने रत्नागिरीतील लाचलुचपत कार्यालय गाठून याची माहिती कार्यालयाला दिली.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अनंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संदीप ओगले, पोहवा संतोष कोळेकर, पोहवा विशाल नलावडे, पो.ना. दिपक आंबेकर, पो.कॉ./हेमंत पवार, पो.कॉ./ राजेश गावकर यांचे पथक तयार करण्यात आले. हे पथक गुरुवारी सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते.
ज्यावेळी तक्रारदार हे विनायक रामचंद्र भोवड याच्याकडे ५० हजाराची रक्कम देण्यासठी गेले तेव्हा त्यांना या पथकाने सकाळी 11:56 वाजता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक रत्नागिरी कार्यालयात पंचासमक्ष लाच रक्कमेसह ताब्यात घेतले आहे. त्यांचेवर शहर पोलीस ठाणे रत्नागिरी येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













