दापोली तालुक्यातील सिया सुरज म्हाब्दी या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सिया हिच्या मृत्यू प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिया हिचा तिच्याच घरच्यांनी मानसिक आणि शारीरिक छळ आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पती सूरज म्हाब्दी , सियाचे सासरे संजय पांडूरंग म्हाब्दी, सासु सुजाता संजय म्हाब्दी तसेच दिर आकाश म्हाब्दी यांच्यावर कलम 498,306, 504 आणि 34 ही कलमं दाखल झाली आहेत. गव्हे ब्राम्हणवाडी येथे सिया सुरज म्हाब्दी या 27 वर्षीय महिलेने समर सुरज म्हाब्दी या 2 वर्षाच्या मुला समवेत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
सियाने आत्महत्या का केली ?
सिया आणि सूरज यांचा प्रेमविवाह झाला होता. सूरज हा वारंवार पैशाची मागणी करत असे. सियाला घरी मारहाण होत होती. सूरज याने अलीकडेच EMI वर मोबाईल घेतला होता ज्याचे हप्ते सुरज हा वेळेवर देत नव्हता हे हप्ते सिया देत होती. या आणि अनेक कारणावरून सियाला पतीचा आणि सासू सासऱ्यांचा त्रास होता.
सिया हिचा भाऊ विनोद गुरव याने तक्रारीत ही बाब मांडली आहे ही तक्रार पुढीलप्रमाणे आहे, “सिया यांच घर त्यांच्या कमाईतूनचं चालत होतं, शिवाय नवऱ्याने दारूसाठी घेतलेले कर्ज त्यांनी फेडले. पण नवऱ्याच्या हट्टपाई सिया यांनी चांगली नोकरी सोडली आणि त्यांच्या बरोबर गावी जायचं ठरवलं”.
“पण गावी गेल्यावर त्यांचे पती सुरज यांनी सिया यांचा मोबाईल, पैसे, सगळं काढून घेतले कोणाशी संपर्क देखील करू दिला नाही. एका रात्री तर सिया यांना त्यांच्या सासरच्या लोकांनी रात्री 1 वाजता बाहेर ठेवलं होतं. त्यांचे पती सुरज त्यांनी सिया यांना गावी नेऊन मारहाण सुद्धा केली होती. सिया त्यांच्या मुलासाठीच जगत होत्या. आणि त्या त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी 6 महिन्यांनी परत शहरात येणार होत्या अशी माहिती आहे.
दरम्यान लग्नाच्या दिड वर्षानंतर बहिणीला पती सुरज हा मित्रा बरोबर दारूचे व्यसन करुन घरी येवून बहिणीला मानसिक त्रास देत होता. सुरज हा बहिणीला मारहाण करीत होता. सूरज घरी येऊन सतत शिवीगाळ करणे, घालून पाडून बोलणे चालु होतं.
लोकांकडून उसने पैसे घेवून त्यांना बहिणीचा फोन नंबर देत असे त्यामुळे लोक बहिणीला फोन करुन सतत विचारणा करून त्रास देत असे बहिणीची परिस्थिती पाहून तिच्या पतीला काम शोधून देतो असं सांगितले मात्र सूरज याने काम केलं नाही”.
“2023 दिवाळीमध्ये कोटक फायनान्स कंपनीचे लोन करून दोन मोबाईल घेतले होते. त्याचे हप्ते चालु होते. सूरज हप्ते भरत नसल्याने 15 दिवसांनी कोटक फायनान्स कंपनीचे लोक मुंबई येथे राहत असलेल्या बहिणीच्या घरी आले परंतु बहिण, पती सुरज हे घरी नसल्याने ते आमच्या घरी येऊन बहिणीची विचारपुस करीत असे त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे माहीती घेतली असता त्यांनी दोन विवो कंपनीचे मोबाईल हप्त्यावर घेतलेले आहेत त्याचे एक हप्ता भरलेला असुन बाकीचे सर्व हप्ते चुकलेले आहेत.
असे फायनान्स यांनी सांगितले म्हणून गावी बहिण व तिचा पती सुरज यांना फोन करुन विचारणा केली असता तिचा पती सुरज याने पैसे भरलेले आहे पैसे देणे बाकी नाहीत असे सांगितले.सिया यांनी आपल्या भावाला सांगितलं तीचा सोन्याचा हार, चैन व दोन अंगठ्या सुरजने विकल्या त्याचे पैसे घेवून फायनान्स वाले यांना न देता स्वतःच मजा केली. त्याबाबत बहिण सिया हिने सुरज याला विचारणा केली असता तिला मारहाण व शिवीगाळी करुन धमकी दिली.
सियाने जमवून ठेवेलेले 60 ते 70 हजार रुपये तिला न सांगता सुरजनेघेऊन मौजमजा केली. सियाचा मंगळसुत्र दिवा येथील स्वेजल ज्वेलर्स येथे गहान ठेवले होते ते मार्च 2024 मध्ये आम्ही 35 हजार भरुन सोडवुन घेतले होते असं भाऊ विनोद गुरव याने तक्रारीत म्हटलं आहे.
बहिणीचा संसार सुरळित चालावा म्हणुन आम्ही पोलीस स्टेशनला, गावातील ग्रामस्थांकडे तक्रार केली नव्हती.
नंतर काही दिवसानी सियाने आम्हाला फोन करुन सांगितले की सुरज हे कामधंदा करीत नाहीत. समाजविण्यास गेली असता मला शिवीगाळी मारहाण करतात, मुलाला इथे ठेवून तु माहेरी निघून जा तुझे तु बघ अस बोलू लागले.
सासु सुजाता संजय म्हाब्दी आणि सासरे संजय पांडूरंग म्हाब्दी व दिर आकाश संजय म्हाब्दी हे सुध्दा तु माहेरी मुलाला ठेवून निघून जा असे बोलून सियाला घालून पाडून बोलतात असे फोन करुन सांगितले” हे सर्व विनोद गुरव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
यानंतर सिया म्हाब्दी ही आपला मुलगा समर याच्याबरोबर शुक्रवारी 28 जून रोजी सकाळी 10:30 वाजता घरातून बाहेर पडली. संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत ती कोठेही आढळून न आल्याने तिची शोधा शोध करण्यास सुरुवात झाली. दरम्यान दापोली पोलीस स्थानकात ती हरवल्याची तक्रार देण्यात आली.
त्याचवेळी घराच्या जवळ असणाऱ्या विहिरीलगत चप्पल आढळून आल्याने विहिरीत तपास करण्यात आला. घराजवळच असणाऱ्या विहिरीमध्ये पाहिले असता सिया व समर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे आढळून आले. सिया म्हाब्दी हिने मुलासोबत विहिरीत उडी टाकून मयत झाल्याची खबर सुरज संजय म्हाब्दी यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली होती.
दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत होते. परंतु या प्रकरणी सिया हिचा भाऊ विनोद गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज व त्याचे आई-वडील यांनी सिया हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. सिया व सुरज यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत होती. सिया व सुरज हे दोघेही मुंबईमध्ये दिवा येथे राहत होते. कालांतराने सुरज याने मुंबईतून गावी येऊन राहण्याचा निर्णय घेतला.
सिया मात्र मुंबई येथे एका दवाखान्यामध्ये नोकरी करत होती. सुरज तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असे. सिया देखील शक्य असतील तेवढे पैसे त्याला देत असल्याचे तिचा भाऊ विनोद याने सांगितले आहे. गावी असणारे आई-वडील वृद्ध असल्याने सिया हिने मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत रहावे, असे तिला सांगण्यात आले. घरच्यांच्या सांगण्याप्रमाणे सिया देखील नोकरी सोडून दापोली मधील गव्हे ब्राह्मणवाडी येथे मार्च अखेरीस राहण्यास आली होती.
इथे आल्यानंतर देखील तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली जात होती. त्यातूनच नेहमी भांडणे होत असल्याचे विनोद यांनी सांगितले आहे. घरून वडील, भाऊ यांच्याकडून पैसे घेऊन ती पती सुरज याला देत असल्याचेही त्याने सांगितले. मागील मे महिन्यामध्ये देखील या दोघांची भांडणे सोडवण्याकरिता दोन्ही कुटुंबातील लोक एकत्र बसले असल्याचे विनोद याने सांगितले. त्यावर सामंजस्याने तोडगाही निघाल्याचे विनोद याने सांगितले. त्यावर सामंजस्याने तोडगाही काढलेला होता.
सिया नेहमी घरच्या लोकांबरोबर फोनवर बोलत असे परंतु गेले दोन दिवस सूरज, सिया दोघांचेही फोन बंद असल्याने काहीही संपर्क झालेला नव्हता.
सिया हिने आपले बाळ छोटे असल्यामुळे कितीही त्रास झाला तरीही बाळासाठी मी कोणतीही टोकाची भूमिका घेणार नाही, असे विनोद गुरव याला सांगितलेले होते. दरम्यान या प्रकरणात दापोली पोलीस तपास करत आहेत.
‘कौटुंबिक समस्या’ किंवा ‘लग्नाशी संबंधित समस्या’ हे या आत्महत्यांमागचं कारण असल्याचं म्हटलं जातं. पण हजारो महिलांनी जीव देण्यामागचं खरं कारण काय आहे?
कौटुंबिक हिंसाचार – डोमेस्टिक व्हायलन्स हे यामागचं मुख्य कारण असल्याचं मानसिक आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
सरकारने नुकत्याच केलेल्या एका पाहणीत सहभागी एकूण महिलांपैकी 30 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी आपल्याला जोडीदाराकडून करण्यात आलेला कौटुंबिक हिंसाचार सहन करावा लागल्याचं सांगितलं.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*
Responses (2)