दापोली : मुरुड गावच्या रस्त्यांची दुरवस्था

banner 468x60

दापोली तालूक्याला निसर्गतःच स्वच्छ सुंदर समुद्र किनारपट्टीचे लेणं लाभलं. आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी समुद्राचे दर्शन होत नाही तेथील लोक पर्यटनासाठी दापोलीत येत असतात. अशा दापोली तालूक्यातील दाभोळ ते केळशी दरम्यानच्या किनारपट्टी भागातील रस्त्यांची खुपच दुरवस्था झालेली आहे.

पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे महागड्या किंमतीची वाहने घेवून पर्यटनासाठी येत असतात. आधीच असलेल्या निमुळत्या रस्त्यांच्या समस्येत रस्त्यांच्या दुरवस्थेने त्यात आणखीनच भर टाकली आहे. त्यात आणखीन कहर म्हणजे पर्यटन व्यवसाय भागातील सतत होणारा खंडीत विज पुरवठा.

आधीच रस्त्यांच्या दुरवस्थेच्या तीव्र समस्येने डोके वर काढलेले असताना विजेच्या सततच्या खंडीत प्रकाराचा मोठाच फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. त्यामुळे दापोलीतीलच नव्हे तर राज्यात ज्या ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टीत पर्यटन व्यवसाय चालतो त्या सर्वच ठिकाणी स्थानिकांना रोजगाराची उपलब्धता होते.

त्याचप्रमाणे आंबा, काजू, त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ, वाल, कडवा, चवळी, कुळीथ आदी कडधान्ये, स्वच्छ ताजे मासे, हंगामात उपलब्ध होणारा कोकणचा रानमेवा आदींसह मटण, चिकन, दुध, दही, ताक, शितपेय, पापड, लोणंच, कुरडया आदी व्यवसायांची वृध्दी होते.

दरम्यानच्या किनारपट्टी भागातील रस्त्यांची खुपच दुरवस्था झालेली आहे. हा रस्ता आता कधी होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *