चिपळूण : हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटने आग

banner 468x60

चिपळूण पागनाका परिसरातील महामार्गालगत असणाऱ्या एका हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटने रविवारी दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच चिपळूण पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले.

banner 728x90

वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या आगीत हॉटेल व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा सांयकाळी उशिरापर्यंत सुरू होता.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पागनाका भागात साहिल दिवेकर यांचे हॉटेल आहे.

या हॉटेलच्या किचनमधून दुपारी एक वाजता अचानक धूर येण्यास सुरवात झाली. हॉटेलमधील चिमणीच्या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात आल्यावर चिपळूणचे माजी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांनी आगीची खातरजमा करून तत्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. आगीची माहिती मिळताच

अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. वाहनचालक सुनील भोजने, फायरमन भूषण भोजने, अमोल वीर, योगेश दळवी, शुभम चिवेलकर, वैभव फणसे, आदी जवानांनी परिश्रम घेतले. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

या आगीत चिमणी पूर्णतः जळून खाक झाली आहे तर अन्य साहित्य व यंत्रसामुग्रीसुद्धा जळून संबंधित व्यावसायिकाचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *