दापोली : न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के

banner 468x60

सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल सलग 19 वर्ष 100% लागला असून विद्यालयाने उज्वल निकालाचे परंपरा अखंडित राखली आहे .

न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयातून एकूण 49 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. 17 विद्यार्थी विशेष प्राविण्य,26 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 6 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले .

गुणानुक्रमे आर्यन देवघरकर 89.80 प्रथम क्रमांक, कौस्तुभ देवकर 85.80 द्वितीय क्रमांक व साई रसाळ 83.60 तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यशस्वी विद्यार्थी यांना सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर सदस्य अशोक जाधव, विजयकुमार खोत, प्रभाकर लाले, गोविंद शिगवण, मुख्याध्यापक संदेश राऊत यांनीअभिनंदन केले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *