कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

banner 468x60

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, फळ बागा आणि पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD)महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

banner 728x90

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडले असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
नुसता पाऊसच पडणार नाही,

तर पावसासोबत वादळ देखील असणार आहे, या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *