गुहागरमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चिपळूणवरून गुहागरला येत असताना हा अपघात झालाय.चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे.
गाडीचा टायर फुटून टेम्पो वळताना पलटी झाला.या घटनेत दोन महिला कामगारांचा गाडीत चिरडून मृत्यू झाला आहे. दरम्यान गुहागर चिपळूण मार्गावरील शृंगारतळी येथील वळणावर टेम्पो पलटी झालाय.
घरावरील स्लॅब टाकण्यासाठी मशिनरी आणि कामगार यांना घेऊन जात असताना टायर फुटून अपघात झाला .गुहागर पोलीस घटना स्थळी रवाना झाला आहे. टेम्पोमध्ये आणखी काहीजण अडकल्याची भीती आहे.
दरम्यान गाडीमध्ये नेमके किती जण होते? कुठुन आले होते? या विषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.सामान अंगावर पडल्याने महिलांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच जवळील गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













