रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार शकील सावंत यांची बदनामी व मानहानीप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने येथील माजी आमदार रमेश कदम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात नकाश अ. बशीर पिलपिले (रा. सैतवडे, ता. रत्नागिरी) व अपक्ष उमेदवार शकील सावंत (रा. सन्मित्रनगर, ता. रत्नागिरी) यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी चिपळूण यांच्याकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीत म्हटले होते की, शकील सावंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाच्या विकासासंदर्भातील मुद्दे घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते व चिपळूण विधानसभा मतदार संघातील माजी आमदार रमेश कदम तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष रईस अलवी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक रंग देऊन अक्षेपार्ह विधाने आणि आरोप त्यांच्याविरुद्ध केले होते.
प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेण्यात आली असून, माजी आमदार रमेश कदम व रईस अलवी यांना मुख्याधिकारी तथा आचारसंहिता पथकप्रमुख विशाल भोसले यांनी नोटीस काढली आहे. या नोटिसीद्वारे पत्र मिळताच पुढील २ दिवसांत तक्रारींच्या अनुषंगाने आपला रितसर खुलासा सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*