सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना रत्नागिरी शहरात वृद्ध वॉचमनचा डोक्यात चिरा घालून खून झाल्याचे उघड झाले असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा कडे जाणाऱ्या रस्त्याजवळ जुन्या रेगे कंपाऊंडमध्ये ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
अशोक वाडेकर असे या प्रौढाचे नाव असल्याचे समजते. मृत व्यक्ती ही कंपाउंड समोरील इमारतीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होती.
या इमारती नजीक ते वास्तव्याला होते. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र याबाबत रत्नागिरी शहर पोलीस तत्काळ कामाला लागले असल्याची माहिती पुढे येत आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













