कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरही शिवसेनेने दावा सांगितला होता. काहीही झालं तरी आम्ही ही जागा सोडणार नाही, अशी येथील नेत्यांची भूमिका होती. मात्र आता या जागेबाबत नवे वृत्त समोर येत आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा अखेर भाजपच्या वाट्याला आल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जागेवरून केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे हे निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसे झाल्यास येथे भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा सामना रंगणार आहे. राणे यांच्या उमेदवारीची आज (28 मार्च) घोषणा होण्याची शक्यता आहे. राणे-उदय सामंत यांच्यात बैठक शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते किरण सामंत हे या जागेवरून निवडणूक लढवण्यास उत्सूक आहेत.
तशी तयारीदेखील सामंत यांनी चालू केली आहे. याच कारणामुळे या जागेवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद चालू आहे. हा वाद मिटवण्याचा दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहे. या मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी नारायण राणे आणि मंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली होती.
मात्र या बैठकीत ठोस काही मसोर आले नव्हते. त्यानंतर आता ही जागा भाजपच्याच वाट्याला येणार असल्याचे समोर येत आहे.
तसे झाल्यास येथून नारायण राणे निवडणूक लढू शकतात. म्हणजेच सिंधुदुर्ग आणि अमरावतीच्या रुपात शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*