रायगड : Nargis Antulay: राज्याचे माजी मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

banner 468x60

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या पत्नीचे निधन झाले.

जीवनसाथी म्हणून निर्गिस अंतुले यांनी ए. आर. अंतुले यांना भक्कम साथ दिली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

आदिती तटकरेंनी व्यक्त केलं दु:ख 

निर्गिस अंतुले यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंत्री आदिती तटकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

“कोकणचे विकासक, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे दुःखद निधन झाले. अंतुले साहेबांच्या जीवनात नर्गिस भाभी यांनी त्यांना भक्कम साथ दिली. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व्यक्त करते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना, ” अशा भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. 

बॅरिस्टर अंतुले यांची राजकीय कारकीर्द

बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत अनेक निर्णय घेतले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता, पोलिसांसाठी फूलपॅण्ट अशा काही धडाडीच्या निर्णयांचा यात समावेश आहे. ते एकूण 18 महिने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर होते. त्यांच्याच कारकिर्दीत लातूद आणि सिधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती.

विशेष म्हणजे तत्कालीन कुलाबा जिल्ह्याचे रायगड हे नामकरण अंतुले यांच्याच कार्यकाळात झाले होते. ए. आर. अंतुले यांच्या संपूर्ण कारकिर्दीत नर्गिस अंतुले पत्नी म्हणून त्यांच्यामागे ठामपणे उभ्या होत्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *