गुहागरमधील दगडफेक प्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या तब्बल 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
चिपळूण शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुहागर येथील सभेसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना चिपळूण येथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
(Nilesh Rane Vs Bhaskar Jadhav) यावेळी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. आमदार भास्कर जाधव आणि निलेश राणे याचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
त्यामुळे चिपळूण शहरात शुक्रवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता.
शुक्रवारी रात्री अखेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*