मंडणगड : रेशन संपले म्हणून पतीची पत्नीला बेदम मारहाण

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील पंदेरी-कोंडगाव येथे घरातील रेशन संपले असं सांगितल्याच्या रागातून पतीने पत्नीला बेदम मारहाण केलीय.

ही घटना गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वा. घडली. महमद उमर चिमावकर (रा.पंदेरी कोंडगाव मंडणगड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पत्नी कैसरी महमद चिमावकर यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, महमद चिमावकर हा कोणताही कामधंदा करत नसल्याने गुरुवारी कैसरी हिने त्याला घरातील रेशन संपले असल्याचे सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला.

या रागातून महमदने घरासमोरील पडवीतील भिंतीवर पत्नी कैसरीचे डोके आपटले. त्यानंतर तिच्या नाकावर स्वतःचे डोेके मारुले त्यामुळे तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला.

तसेच पाठीवर हातांच्या ठोशांनी व बुक्क्यांनीही जबर मारहाण केली. याप्रकरणी अहमद चिमावकर विरोधात भादंवि कायदा कलम 324,323,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *