Breaking News
मोठी बातमी – TWJ घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधार समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला गुजरातमधून अटक, ठाणे पोलिसांची कोकण कट्टा न्यूजला माहिती गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, कोकण कट्टा न्यूजने वेळोवेळी लावून धरली होती बातमी, गुतवणूकदारांनी मानले कोकण कट्टा न्यूजचे आभार BIG NEWS सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दापोली : शहरात उनाड गुरांचा हैदोस, व्यापारी आणि ग्राहक हैराण दापोली : हॉटेल कामगार महिलेचा चक्कर येऊन मृत्यू, परिसरात हळहळ चिपळूण : अवैध पशुवाहतुकीवर पोलिसांची कारवाई, 14 लाखांच्या मुद्देमालासह 7 म्हशी, एका गाईची सुटका

चिपळूण : ‘संविधानाद्वारे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा’; हिंदू जनजागृती अधिवेशनात मोठी मागणी

banner 468x60

भारत हे स्वयंभू हिंदू राष्ट्र आहे, तरी विद्यमान संविधानिक व्यवस्थेत त्याला हिंदू राष्ट्र म्हणून दर्जा कुठे आहे? त्यामुळे संविधानाद्वारे भारताला हिंदू घोषित केल्याविना आजच्या स्थितीत भारताला हिंदू राष्ट्र म्हणता येणार नाही.

banner 728x90

त्यामुळे भावनात्मक विचार करण्यापेक्षा संविधानिक हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) घोषित होण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सनातनचे (Sanatana Dharma) चेतन राजहंस (Chetan Rajhans) यांनी केले.

हिंदू जनजागृती समितीच्यावतीने शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय हिंदू-राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी साधनेचे महत्त्व या विषयावर सत्यवान कदम यांनी मार्गदर्शन केले.

धर्मशिक्षणासाठी मंदिर विश्वस्तांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे विचार श्री देव भार्गवराम परशुराम विश्‍वस्त अभय महाराज यांनी व्यक्त केले. अधिवेशनाला विविध संघटना, संप्रदाय, व्यावसायिक, राजकीय पक्षाचे १२० प्रतिनिधी उपस्थित होते. अधिवेशनाचा उद्देश हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर यांनी मांडला.

आडिवरे येथील श्री महाकाली देवस्थानचे विश्वस्त स्वप्नील भिडे, चिपळूण मनसे शहराध्यक्ष अभिनव भुरण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे गणेश गायकवाड, अधिवक्ता सचिन रेमणे, मिलिंद तांबे, टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवस्थान अध्यक्ष चंद्रकांत कदम, राजापूरच्या हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान महेश मयेकर, डॉ. धर्मश्री शेवाळे यांनी आपले अनुभव कथन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *