Mandangad मंडणगड :  खळबळजनक! मंडणगडात ट्रॅक्टरवर सापडल्या जिलेटीनच्या कांड्या

banner 468x60

तालुक्यातील भिंगळोली येथील एका प्राैढाने ट्रॅक्टरवर लपून ठेवलेल्या जिलेटीनच्या १५४ कांड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून, ४ लाख ०२ हजार ७८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रतनलाल बाळू रामजी तेली (४३, रा. समर्थनगर भिंगळोली, मंडणगड, मूळ रा. पहुना, चित्तोडगड, राजस्थान) असे गुन्हा दाखल केलेल्या प्राैढाचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७:४५ वाजता करण्यात आली.

भिंगळोली येथील रतनलाल तेली याच्या ट्रॅक्टरवर १५४ जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या होत्या. या कांड्या पांढऱ्या प्लास्टिक आच्छादनामध्ये गुंडाळून ठेवलेल्या हाेत्या. त्यावर इंग्रजीमध्ये डेंजरस एक्सप्लोझिव्ह, टायगर सुपर पाॅवर ९० जाेगनिया

एक्सप्ललोझिव्ह प्रा. लि. गाव हदियाखेरी अॅण्ड कंपनी, जि. भिलवारा, राजस्थान असे लिहिलेले होते. तसेच १५ डेटाेनेर सापडले असून, सर्वांच्या एका तोडाला इलेक्ट्रीक वायर जोडलेल्या होत्या.

तसेच ९ नोडल कॅपचा सेट, लाल रंगाची १९८ रुपयांची ९ मीटर लांब कोरटेक्स वायरही सापडली आहे. हे सर्व साहित्य ठेवलेला ट्रॅक्टर (आरजे ०९, आरबी १०२३) ही जप्त करण्यात आला आहे. मंडणगड पोलिसांनी रतनलाल बाळू रामजी तेली याच्याविरोधात भारतीय दंड विधान कायदा कलम २८६ व स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *