चिपळूण शहरातील पाग येथे एका उच्चशिक्षित २८ वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासू ,सासरे नणंद या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कोमल सचिन दिलवाले (२८, रा. पाग) हिने गुरुवारी आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. सासरच्यांकडून पैसा व दागिन्यांसाठी तिचा छळ सुरू होता अशी तक्रार तिच्या भावाने दाखल केली आहे.
पाग येथील पंचम हार्मनी इमारतीत राहणाऱ्या बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतलेल्या कोमल सचिन दिलवाले (२८, रा. पाग) हिने घरात कोणीच नसताना दीड वर्षाच्या मुलासमोर गळफास घेऊन आत्महत्या केली. चिपळूण पोलीस ठाण्यात पती सचिन दिलवाले यांनी माहिती दिल्यानंतर कोमलचे पार्थिव कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. परंतु तिचा शवविच्छेदन अहवाल मिळेपर्यंत पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नव्हता.
गुरुवारी (२१ डिसेंबर) दुपारच्या सुमारास कोमलने आयुष्य संपवले. दरम्यान, पैसे आणि दागिन्यांसाठी पती, सासू, सासरे, नणंद यांनी मानसिक दबाव टाकून आपल्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या हिंगोली येथील भावाने चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे.
कोमलचा भाऊ ऋषीकेश कुलभूषण निधानकर (३२, बांगर नगर, हिंगोली) याच्या एकुलत्या एका बहिणीचे २६ मे २०१९ रोजी सचिन दिलवालेबरोबर लग्न झाले होते. सुरुवातीला तिने नोकरी करू नये असे सासऱ्यांनी सांगितले होते. पण नंतर कोमलने नोकरी करावी यासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला.
याच काळात तिला क्रिशू नावाचे बाळ झाल्याने नोकरी करणे अवघड झाले. परंतु सेवानिवृत्त शिक्षक असलेले सासरे माणिक दिलवाले, शिक्षिका सासू कल्पना दिलवाले, पती सचिन दिलवाले व नणंद नंदिनी यांनी नोकरी करण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला.
दिलवाले यांनी गाळा खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशाची व सोन्याच्या दागिन्यांची माहेरी मागणी करून तिचा मानसिक छळ केला. या मानसिक दबावामुळे कोमलने आत्महत्या केली आहे.
तिला सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करणारी तक्रार चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील अधिक तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













