रायगडच्या मांडवा येथे खासगी स्पीड बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. समुद्र किनारी पार्क केलेल्या स्पीड बोटीला ही आग लागली.
या आगीत दोन खलाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर समुद्रात असलेल्या बोटीवर असलेल्या लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं.
(Latest Marathi News) मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथील मांडवा बंदरात उभ्या असलेल्या बेलवेडर या खासगी स्पीड बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीत बोटमधील दोघे खलाशी जखमी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी आलीबाग येथे हलविण्यात आले आहे. एसीसाठी जनरेटरचे कनेक्शन करीत असताना अगर बॅटरी कनेक्शनमधील बिघाड दुरुस्त करत असताना स्फोट झाला. त्यानंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मांडवा येथील सागरी पोलीस घटनास्थळी पोहोचले.
या सागरी पोलिसांना बोटीला लागलेली आग विझविण्यात यश आलं आहे. तर या आग आणि स्फोटादरम्यान बोटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













