दापोली : नगरपंचायतीचा तब्बल 9 कोटींचा आर्थिक घोटाळा, खालीद रखांगे आणि रवींद्र क्षीरसागर या नगरसेवकांची चौकशी, कोणत्या नगरसेवकाची अडचण वाढणार ?

banner 468x60

दापोली नगरपंचायतचा चर्चेत असलेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. दापोली नगरपंचायतीचा आर्थिक घोटाळा हा तब्बल 9 कोटींचा असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नगरपंचायतीच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी दोन विद्यमान नगरसेवक खालीद रखांगे आणि रवींद्र क्षीरसागर यांची चौकशी झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 20 ते 25 जणांची चौकशी झाल्याची माहिती आहे.

यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. नगरपंचायतचे निलंबीत कर्मचारी दीपक सावंत यानेच गोवा येथील ट्रीपचे खालीद रखांगे आणि रवींद्र क्षीरसागर या दोन नगरसेवकांचे बुकिंग केल्याचं दिसत असल्याने ही चौकशी करण्यात आली आहे. मात्र दीपक सावंत याला आम्ही रोखीने पैसे दिले होते.

त्याने केवळ बुकिंग केले, अशी माहिती पोलीस तपासात या नगरसेवकांनी दिल्याची पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत अधीक माहितीसाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जनार्दन परबकर यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी म्हटलं

“याबाबतचा सविस्तर तपास सुरु आहे. आम्ही जवळपास आतापर्यंत 20 ते 25 जणांची चौकशी केली आहे. या प्रकरणामध्ये आर्थिक घोटाळ्याचा आकडा वाढूही शकतो. मात्र काही दिवसात आम्ही या प्रकरणाचा खुलासा करू. “

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना संपर्क केला असता त्यांच्याजवळ संपर्क होऊ शकला नाही.

दापोली नगरपंचायतचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्याजवळ संपर्क केला असता त्यांनी याबाबत मी नंतर बोलेन असं बोलून प्रतिक्रिया देणं टाळलं.

दापोली भाजप नेते केदार साठे यांना संपर्क केला असता त्यांच्याजवळ संपर्क होऊ शकला नाही.

दापोली नगरपंचायतचे नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनाही आम्ही संपर्क केला असता त्यांनी म्हटलं

“आम्ह्यला स्टेट्मेंट्साठी बोलावण्यात आलं होतं. आमच्याकडे नगरपंचायत मधील पैशाचा व्यवहार होत नाही. नगरसेवक कोणताही बील काढत नाही. जे दौरे होतात त्यांचं नियोजन मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी करत असतात. याबाबत आमच्याकडे कोणते अधिकार नसतात. आमचं फक्त पॉलिसी मॅटर असतो आणि कोणते ठराव मंजूर करायचे असतात याबाबत चर्चा होते.”

आजवर या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी 20 ते 25 जणांची चौकशी करण्यात आली. ही माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण अधिवेशन विभागाकडून देण्यात आली आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू असून या चौकशीसाठीच विद्यमान नगरसेवक खालीद रखांगे आणि रवींद्र क्षीरसागर यांना पोलिसांनी बोलावून घेतले होते.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जनार्दन परबकर यांच्या उपस्थितीत तब्बल अर्धा दिवस ही चौकशी सुरू होती.

चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांचे अद्याप कोणताही थेट सहभाग दिसत नसला तरी त्यांचे बँकेतील व्यवहार किंवा सहभागाबद्दल अद्याप चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. नगरपंचायत प्रशासनाने निलंबित केलेले अस्थायी कर्मचारी दीपक सावंत यांनी जवळपास नऊ ते दहा कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

सध्या दीपक सावंत हे जामीनावर बाहेर आहे. मात्र कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात अनेकांचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आजवर अनेकांची चौकशी केली आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मुलगा फैजल रखांगे याचीही चौकशी करण्यात आली होती.

नगरपंचायतीत आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्याकरता राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक खालीद रखांगे आणि शिवसेनेचे रवींद्र क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती.

या प्रकरणी तत्कालीन लेखापाल दीपक सावंत याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात दापोली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर हा सगळा तपास रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या सगळ्या आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाकडून एक एजन्सी नेमण्यात आली आहे.

या तपासात मुंबई, दिल्लीपर्यंत या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली असून हवालामार्फतही काही मोठ्या आर्थिक देवाण घेवाण झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिले आहे. आतापर्यंत या घोटाळ्यात सुमारे नऊ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *