Big BREAKING : मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय, निलेश राणे यांचा मोठा निर्णय

banner 468x60

माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट निलेश राण Nilesh Rane Quits Politics)  यांनी केलं.

निलेश राणेंच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे. निलेश राणे ट्विटने चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निलेश राणेंच्या  कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार आहेत.

banner 728x90

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. कोकण आणि राणे असे समीकरण गेल्या काही वर्षात कोकणात पाहायला मिळत आहे. 

नमस्कार,

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. 

मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

https://x.com/meneeleshnrane/status/1716709978227290112?s=46&t=AS4ZwoIOWJmUpDzQmAO7bQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *