उदय सामंत : कातळशिल्पे संरक्षित करून रिफायनरी प्रकल्प राबविणार

banner 468x60

तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या जागेत असलेल्या कातळशिल्पांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व कातळशिल्पांचे केंद्र शासनाच्या निकष आणि नियमांप्रमाणे संवर्धन केले जाणार आहे.

तर बारसूत प्रकल्पस्थळातील काही जागेत कातळ शिल्पे असल्याने आता ती वगळून आणखी काही जागा या प्रकल्पासाठी संपादीत करून हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असल्याची माहिती राज्याचे उदयोगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राजापूरात पत्रकार परिषदेत दिली.

banner 728x90

रविवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या ना. सामंत यांनी राजापुरातील शासकिय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना माती परिक्षण अहवाल अदयाप प्राप्त झालेला नसून तो प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाबाबत पुढील कार्यवाही होईल असे नमुद केले.

प्रकल्पस्थळी असलेली कातळशिल्पे व त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीत काही अडचणी आहेत काय या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी कातळशिल्पे योग्य पध्दतीने संरक्षित करण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या बारसूमध्ये प्रकल्पासाठी जी जागा ठरविण्यात आली आहे, माती परिक्षण झाले आहे

त्यातील काही भागात कातळशिल्पे आढळून आली आहेत. मात्र या सर्व कातळ शिल्पांचे तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयात ज्या ज्या ठीकाणी अशा प्रकारची कातळ शिल्पे आहेत ती संरक्षित केली जाणार असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे व निकषाप्रमाणे ही कातळ शिल्पे संरक्षित केली जातील असेही सामंत यांनी सांगितले.

बारसू व परिरात प्रकल्प राबविण्यासाठी मोठया प्रमाणावर जमीन मालकांची संमती पत्रे आलेली आहेत व येत आहेत. आता प्रस्तावित काही जागेत कातळशिल्पे आढळून आल्याने वाढीव जमीन आवश्यक असून ती देखील उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून काहींनी संमतीही दिली आहे.

त्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व जागा या ठिकाणी उपलब्ध असल्याचा दावाही सामंत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *