रत्नागिरी : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर

banner 468x60

रत्नागिरी बुट्टीबोरी या राष्ट्रीय महामार्गावरील घरणी येथे सर्विस रोडवरून बोगदा पास करत असताना दुचाकीला ट्रकने धडक दिली. यात आईला भेटून आपल्या चांबरगा गावाकडे निघालेली मुलगी गंभीर जखमी झाली तर जावयाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजता घडली.

राष्ट्रीय महामार्गावरील घरणी गावात जाणार्‍या बोगद्याजवळ सर्विस रोड पास करत असताना लातूरहुन नागपूरकडे जाणार्‍या ट्रकने आणि वडवळ नागनाथ येथुन चांबरगा कडे निघालेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चांबरगा येथील रहिवाशी भिमाशंकर रावसाहेब मुळे (42) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी अनिता भिमाशंकर मुळे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

banner 728x90

घटनास्थळी चाकूरचे पोलीस निरीक्षक एस.डी. नरवाडे यांनी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार ईश्वर स्वामी आणि पोलीस कॉन्स्टेबल रितेश अंदुरकर यांच्यासह महामार्ग पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान मालवाहू ट्रक आणि ट्रक ड्रायव्हर यांना ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी बुट्टीबोरी या राष्ट्रीय महामार्गावर घरणी येथे बोगद्याजवळ सर्विस रोडला आणि वडवळ नागनाथ येथुन येणार्‍या रस्त्यावरही गतिरोधक आवश्यक आहेत. हे गतिरोधक नसल्यामुळेच महामार्गाच्या सर्विस रोडवरून वाहने भरधाव वेगाने येत आहेत त्यामुळे अपघात होत असुन या ठिकाणी गतिरोधक करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *