रत्नागिरी : पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई

banner 468x60

गेल्या दोन आठवड्यांत ब्राऊन हेरॉईनवर चौथी कारवाई पोलिसांनी केली आहे. वाढत्या कारवाईमुळे अमली पदार्थांची रत्नागिरी शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहराजवळील काजरघाटी तिठा ते कुवारबावकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

banner 728x90

काजरघाटी ते कुवारबाव रस्त्यावर सायंकाळी संशयास्पद फिरताना दोन संशयित पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांना हटकून झडती घेतली असता त्याच्यांकडे ब्राउन हेरॉईनसदृश अमली पदार्थ मिळून आला.

छोट्या छोट्या पुड्यांमध्ये सुमारे ८० हजारांचा हा अमली पदार्थांचा साठा मिळून आला. नजफ आसिफ मिरजकर आणि मतीन महामूद शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *