रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर भरधाव ट्रेलरची एसटीला धडक ,एकजण ठार

banner 468x60

Kokan Accident News : मुंबई-पुणे महामार्गावर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि-२९) रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास एसटी आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला.

या अपघातात एसटी वाहक जागीच ठार झाले असून ट्रेलरमधील चालक हा गंभीर जखमी झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

banner 728x90

मुंबई-पुणे महामार्गावर उमरगा ते ठाणे ही एसटी महामंडळाची बस,पुण्याहून मुंबईकडे चालली होती.रसायनीजवळ आल्यानंतर एसटी चालकाने प्रवाशी उतरवण्यासाठी महामार्गावरील रिसवाडी उड्डाणपुलाजवळ शोल्डर लाईनला एसटी उभी केली.

यावेळी बसमधील प्रवाशांना कंडक्टर शिवराज माळी (वय-३५) यांनी खाली उतरवलं आणि माळी हे एसटीच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले.

याचवेळी काही मिनिटांतच पाठीमागून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरने उभ्या असलेल्या एसटीला मागून जोरात धडक दिली. हा अपघात एवढा भयानक होता की एसटीच्या मागे उभे असलेले कंडक्टर शिवराज माळी हे या दोन्ही वाहनांच्या मध्ये अडकले गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महामार्गावर उभी असलेली एसटी दिसून न आल्याने ट्रेलर चालकाचा ट्रेलरवरचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला असावा, असं सांगितले जात आहे. या अपघातामध्ये एसटीतील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या अपघातामध्ये ट्रेलर चालकाच्या पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *