रत्नागिरी : पावसाळ्यातही टँकरने पाणी, माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांच्याकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा

banner 468x60

ऐन गणेशोत्सवात शीळ धरणातील जॅकवेल कोसळली आणि शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मिरकरवाडा येथे माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी धाव घेतली आहे. या भागात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने पाणी पुरवठा तत्काळ सुरू केला आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईचे संकट कोसळले. शीळ धरणावरील जॅकवेल कोसळली आणि शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. घराघरात मुंबईकर चाकरमानी दाखल झाले असताना पाणीबाणी निर्माण झाली.

रनप प्रशासनाने पाणी समस्या दूर करण्यासाठी युद्धपातळीवर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनाच्या मदतीसाठी माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी धाव घेत मिरकरवाडा येथे पाणी पुरवठा करण्यासाठीचे नियोजन केले.

त्यांच्या कामाचे मिरकरवाडा येथे कौतुक होत असून यामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यात काही प्रमाणात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *