लोकसभेनंतर नीलेश राणे आता विधानसभा निवडणूक लढवणार?

banner 468x60

कुडाळचे पुढचे आमदार नीलेश राणे (Nilesh Rane) असतील. तुम्ही त्यांना साथ द्या, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचे पेड पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात केले. तालुक्यातील अणाव-घाटचे पेड या पुलाची उंची वाढवणे या विकासकामाचा लोकार्पण सोहळा काल येथे झाला.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


या सोहळ्याचे उद्‍घाटन पालकमंत्री चव्हाण व माजी खासदार राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, युवा उद्योजक विशाल परब, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच अदिती अणावकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर.


तसेच मंडल अध्यक्ष दादा साईल, ज्येष्ठ पदाधिकारी राजू राऊळ, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, विनायक अणावकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, अजय आकेरकर, अधीक्षक अभियंता छाया नाईक, अजय सर्वगोड, मोहन सावंत, रुपेश कानडे, प्रज्ञा राणे, पप्या तवटे, तेजस माने, साधना माड्ये आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले,

‘‘विकासाची तळमळ असणाऱ्या नेत्याला साथ देण्याची आपली जबाबदारी असते. या मतदारसंघामध्ये यापुढे माजी खासदार राणे हे आमदार म्हणून उभे राहणार आहेत. तुम्ही त्यांना साथ द्या. त्यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ, पाठपुरावा करण्याची धावपळ आहे, ती या ठिकाणच्या आमदारांमध्ये नाही.

महाविकास आघाडीच्या काळात निधीअभावी रखडलेल्या विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने चालना दिली. भावनिक आवाहनावर विकास होत नसतो. समविचारी पक्षाच्या सरकारला पाठिंबा देऊन आपल्या गावाचा विकास करायचा असतो.’’


पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची शपथ घेताना मी प्रधान सेवक म्हणून काम करणार, अशी ग्वाही दिली होती, त्याचप्रकारे लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे. या पुलाचे काम महाविकास आघाडीमुळे रखडले होते. नाबार्डमधून मंजूर झालेले हे काम ‘महाविकास’ सरकारने रखडून ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *