रत्नागिरी : वेश्या व्यवसाय प्रकरणातील 6 संशयितांना सशर्त जामीन मंजूर

banner 468x60

शहरातील सिद्धीविनायक नगर येथे वेश्याव्यवसाय चालविल्याचा आरोप असलेल्या 6 संशयितांची न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी जामीन मंजूर करताना न्यायालयाने संशयितांनी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावायची असून पोलिसांना तपासात सहकार्य करावयाचे आह़े, असा आदेश न्यायालाने दिला आह़े.

🔴 कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी Kokan Katta Live .. YouTube https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

banner 728x90

चैनलला subscribe करा आणि आवडल्यास व्हीडिओ जरूर शेअर करा

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


समीर मंगेश लिंबुकर (23, ऱा साडवली देवरूख), श्रीमंत चंद्रम पूजारी (55, ऱा फणसोप सडा मुळ ऱा कर्नाटक), स्वप्नील बाळकृष्ण इंदुलकर (40, ऱा रेल्वेस्टेशन रत्नागिरी), रोहन मंगेश कोळेकर (30, ऱा सिद्धीविनायक नगर रत्नागिरी), अरबाज अस्लम चाऊस (25, ऱा साखरतर रहमत मोहल्ला, रत्नागिरी) व साई पसाद साळुंखे (21, ऱा कोकणनगर रत्नागिरी) अशी जामीनावर मुक्तता झालेल्या संशयितांची नावे आहेत़


रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिल़ा.


शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुह्यानुसार शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी- सिध्दिविनायक नगर येथील एका फॅल्टमध्ये दोन तरुणींचा वापर करुन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होत़ी

त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 20 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास छाटा टाकला होत़ा यावेळी संशयित आरोपी राजेंद्र चव्हाण हा वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े त्यानुसार मुख्य संशयित आरोपी राजेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होत़ी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *