दाभोळ : भारती शिपयार्ड कर्मचाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे पैसे देत नाही, तोपर्यंत भंगार काढू देणार नाही योगेश कदम आक्रमक

banner 468x60

दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय कोणालाही या कंपनीतील भंगार विक्रीसाठी बाहेर काढू देणार नाही, असा इशारा आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

आमदार योगेश कदम म्हणाले, उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनी (लिक्विडेशन) मध्ये निघाली असून, या कंपनीची सर्व मालमत्ता स्क्वेअर पोर्ट या कंपनीने १७६ कोटी रुपयांना घेतली आहे.

भारती शिपयार्ड या जुन्या कंपनीतील कर्मचारी व ठेकेदार यांची सुमारे १७ कोटी रुपयांची देणी असून ही सर्व देणी नव्या कंपनीने दिल्याशिवाय या कंपनीतील कोणतीही मशिनरी अथवा भंगार आम्ही कंपनी बाहेर काढू देणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या मागे आपण आमदार म्हणून पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या कंपनीच्या कामगार युनियनने कामगारांना देय असलेल्या रकमेच्या १० टक्के रक्कम स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आपल्याला मिळाली असून, जेवढे कर्मचारी व ठेकेदार यांचे देणे रक्कम आहे ती पूर्ण रक्कम या नव्या कंपनीने दिली पाहिजे.

या संदर्भात गुरुवारी (ता. १७) दुपारी २.३० वा. उसगाव येथे मिलिंद गोयथळे यांच्या निवासस्थानी कामगारांची एक बैठक घेणार असून, त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत. या पत्रकार परिषदेला उन्मेष राजे व भगवान घाडगे उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *