रत्नागिरी : गॅस टँकरची कारला धडक , टँकर वीस ते पंचवीस फूट खोल दरीत

banner 468x60

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा निवळी घाटातील एका अवघड वळणावर LPG गॅस टँकरने कारला धडक दिल्यानंतर टँकर थेट दरीत कोसळला.

मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, कारमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच टँकर चालक देखील बचावला असून तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. दरम्यान कंटेनर ड्राइवरने बाजूला उडी मारून दुसऱ्या एका कंटेनरमध्ये बसून गेला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, हवालदार घाग, हवालदार, अंब्रे, हवालदार मुरकर, हवालदार संसारे, हलालदार शिंदे घटनास्थळी दाखल झाले.

तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी देखील दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी अग्निशमक दलाचे ७ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार तालुक्यातील जयगड येथून हा टँकर गॅस भरून नाशिकला जात होता; परंतु निवळी घाटात अचानक टँकरचा ब्रेक निकामी झाला.

त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टँकरने एका कारला धडक देत टँकर थेट तीस ते चाळीस फूट खोल दरीत कोसळला. दरम्यान गॅस टँकर लीकेज होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने एमआयडीसी येथील सात कर्मचारी दाखल झाले आहेत.

चालकाने गाडीतून उडी टाकत आपला प्राण वाचवल्याचे बोलले जात आहे. मात्र तो घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात टँकरने धडक दिलेल्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *