रत्नागिरी : सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी 9 आरोपींना अटक

banner 468x60

शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायकनगरमधील एका इमारतीत चालणाऱ्या वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य संशयिताच्या आणखी सहा साथीदारांना पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यातील काहीजण स्वतः गिऱ्हाईक म्हणून जात होते, तर काही जण त्या ठिकाणी गिऱ्हाईक पुरवण्याचे काम करत होते. हे संशयित शहर परिसर व ग्रामीण भागातील असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारामुळे रत्नागिरीत या व्यवसायाचे रॅकेट दूरवर पसरल्याची चर्चा सुरू आहे.

banner 728x90

या प्रकरणातील मुख्य संशयितासह दोघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अरबाज असलम चाऊस (साखरतर, रत्नागिरी), साईप्रसाद साळुंखे (कोकणनगर, रत्नागिरी), रोहन मंगेश कोळेकर (शिवाजीनगर, रत्नागिरी), प्रवीण प्रकाश परब (गवळीवाडा, रत्नागिरी), नाविद अश्रफ कनवाडकर (उद्यमनगर, रत्नागिरी) आणि एक महिला अशी सहा संशयितांची नावे आहेत.

ही घटना गुरुवारी (ता. २०) दुपारी घडली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिद्धिविनायक येथील भाड्याच्या रुममधून दोन महिलांसह मुख्य संशयित राजेंद्र रमाकांत चव्हाण (मिरजोळे) याला अटक केल्यानंतर पुढील तपासात आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली होती.

उसन्या घेतलेल्या आर्थिक व्यवहारातून हा व्यवसाय सुरू झाल्याचीही चर्चा होती. वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य संशयित राजेंद्र चव्हाणच्या अन्य सहा साथीदारांना शहर पोलिसांनी शनिवारी (ता. २९) रात्री अटक केली.

त्यामुळे या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची संख्या दहा झाली असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे गुन्हे घडत असतील किंवा अशा संशयास्पद व्यक्ती व घटना आढळून आल्यास तात्काळ डायल ११२ वर अथवा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222 वर संपर्क साधावा असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *