तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी, सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने पहाटे ६ वाजता बाजारपेठेतील पूर्ण पाणी ओसरले आहे. चांदेराई बाजारपेठेतील लहान मोठी १०० पेक्षा अधिक दुकाने बाधित झाली तर चांदेराईमध्ये ५ ते ६ घरे तर हरचेरीमध्ये अनेक घरे या पुरात बाधित झाली आहेत.

अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचलाय तर चांदेराई पुलावर कठडा २ वर्षांपूर्वी दुरुस्त केलेला तुटला आहे. चिंद्रावली रस्ता खचला तर रत्नागिरी देवधे महामार्ग चांदेराई मलुष्ट्येवाडी येथे नदीपात्र वळण दुरुस्ती व गॅबीयन वॉलचे काम निविदा होऊनही पावसाळ्यापूर्वी न केल्याने नदीकिनाऱ्यावरची दरड अजून कोसळली आहे.
त्यामुळे या रस्त्यावर जीवितहानी होण्याची भीती वाढली आहे.या वर्षी नदीपात्रातील गाळ बाहेर न काढल्याने तो गाळ परत नदीपात्रात गेला. चांदेराई पुलाच्या वरच्या बाजूला किमान २ किमी व खालच्या बाजूला १ किमी गाळ उपसा करून तो गाळ नदी पात्रातून बाहेर काढल्यास तसेच हरचेरी कसबा या ठिकाणचा २ किमीमधील गाळ काढल्यास चांदेराई व हरचेरीवासीयांचा प्रती वर्षाचा पुराचा त्रास कमी होईल व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचे होणारे नुकसान टळेल, असे मत चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी मांडले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













