रत्नागिरी : वेश्या व्यवसाय प्रकरणात आणखी दोघांना अटक

banner 468x60

शहरातील शिवाजीनगर परिसरातील सिद्धीविनायक नगर येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्य़ा. या प्रकरणामध्ये सापडलेल्या डायरीमध्ये १५० जणांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील दोन जण असून अमली पदार्थ तस्करीमध्येही ते सामील आहेत. त्यांना अटक केली असून काहींचे सीडीआर काढण्यात येणार आहे. अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर (36, रा.बोर्डिंग रोड माळनाका,रत्नागिरी) आणि ओमकार जगदीश बोरकर (चिंचखरी, रत्नागिरी) अशी दोघा संशयितांची नावे आहेत़. मुख्य आरोपी राजेंद्र चव्हाण याच्या मदतीने हे तिघे जण वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आह़े. शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी-सिध्दिविनायक नगर येथील एका फॅल्टमध्ये दोन तरुणींचा वापर करुन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 20 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास छाटा टाकला होत़ा यावेळी संशयित आरोपी राजेंद्र चव्हाण हा वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े त्यानुसार राजेंद्रवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होत़ी. पोलिसांकडून राजेंद्र याची कसून चौकशी करण्यात आल़ी तसेच राजेंद्र याचा मोबाईल क्रमांकाच्या सीडीआर तपासण्यात आल़े. यावेळी राजेंद्र हा सातत्याने दोघाच्या संपर्कात असल्याचे दिसून आल़े त्यानुसार पोलिसांनी याबाबत पुढील तपास केला असता दोन्ही साथिदारांच्या मदतीने राजेंद्र हा वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे उघड झाल़े हे तिघेही या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आह़े शहर पोलिसांकडून यापकरणी 25 जुलै रोजी या दोन्ही संशयितांना अटक केली. दरम्यान,राजेंद्र चव्हाणच्या पोलिस कोठडीचीही मुदत मंगळवारी संपल्याने या तिन्ही संशयित आरोपींना एकत्रित न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत केली.याप्रकरणी शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *