खेड : जिजामाता भाजी मंडईत 9 फुटी भली मोठी मगर

banner 468x60

दापोली रस्त्यावरील जिजामाता भाजी मंडई खेड येथे मगर असल्याची बातमी पोलीस स्टेशन खेड यांच्याकडून मिळाल्यानंतर वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक खेड तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909


सुमारे ९ फुट लांबीची मगर मंडईच्या शेडमध्ये बसलेली होती. ही मगर खूपच मोठी असलेने मगरीस पकडणे वन्यजीव बचाव पथकासमोर खूप मोठे आव्हान होते.

अथक प्रयत्नाने या मगरीला पकडून खेड नगर परिषदेच्या ट्रॅक्टर ठेवुन पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून त्यानंतर तीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी वन्यजीव बचाव पथक खेडचे सुरेश उपरे परिमंडळ वन अधिकारी खेड, राणबा बंबकर वनरक्षक खवटी, परमेश्वर डोईफोडे वनरक्षक तळे, अशोक ढाकणे वनरक्षक काडवली,

प्रियंका कदम वनरक्षक आंबवली, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सदस्य सर्वेश पवार, रोहन खेडेकर, श्वेत चोगले, सुरज जाधव, सुमित म्हाप्रळकर, यश खेडेकर, तसेच पोलीस स्टेशन खेड चे पोलीस अधिकारी यांनी केली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *