रत्नागिरी : 1 कोटी 23 लाख रुपयांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एक जेरबंद

banner 468x60

बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १ कोटी २३ लाख रुपयांना लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका आरोपीला जेरबंद करण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आले आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

banner 728x90


संशयित आरोपीने फिर्यादी यांच्या मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँक खात्यातून ३ कोटींचा फ्रॉड झाल्याची खोटी भीती घातली होती. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी करून फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी रत्नागिरीतील सायबर पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तांत्रिक विश्लेषण आणि बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांचे पथक मुंबई व ठाणे येथे रवाना झाले होते. स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने सापळा रचून २३ जानेवारी २०२६ रोजी एकाला ( पुढील तपासकामी पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केले नाही ) मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्यासह हेडकॉन्स्टेबल संदीप नाईक, कॉन्स्टेबल अजिंक्य ढमढेरे, सौरभकदम, रोहन कदम, नीलेश शेलार यांच्या पथकाने या भामट्याला अटक केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *