दाभोळ : दाभोळ–बुरोंडी गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून स्मिता जावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल, एकाच गटातून भाजपकडून दोन अर्ज दाखल, एबी फॉर्म कुणाला? युतीबाबत संभ्रम

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात भाजप–शिवसेना युती असतानाच दापोली तालुक्यातील दाभोळ–बुरोंडी जिल्हा परिषद गटात राजकारणाने अचानक वेग घेतला आहे.


दापोली तालुक्यातील दाभोळ–बुरोंडी जिल्हा परिषद गटात राजकीय चित्र गुंतागुंतीचे झाले आहे. भाजपकडून स्मिता जावकर यांनी जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केल्याने एकाच गटातून भाजपकडून दोन अर्ज दाखल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दापोलीत युतीबाबत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय.

banner 728x90

दाभोळ–बुरोंडी गटातून यापूर्वी साधना मिहीर महाजन यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यानंतर भाजपच्या स्मिता जावकर यांच्या अर्जामुळे अधिकृत उमेदवार कोण असणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाचा अधिकृत एबी (AB) फॉर्म कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘भाजपचा खरा उमेदवार कोण?’ असा सवाल उपस्थित झाला असून पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजप–शिवसेना युती असली तरी दापोलीत युती न होण्याचे संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ऐनवेळी नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप–शिवसेना युती जाहीर असतानाही दापोलीत युती न होण्याचे संकेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. ऐनवेळी युतीचा निर्णय बदलतो की बंडखोरीला वाट मोकळी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम तारीख असून स्मिता जावकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताच दाभोळ–बुरोंडी गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्मिता जावकर या राजकीय क्षेत्रात सक्रिय असून स्थानिक पातळीवर त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. या गटातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने दापोली येथील प्रांत कार्यालयात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅली काढण्यात आल्याने परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

🎥©️2026 Kokan Katta News, Media Network
Editor (संपादक) – Tejas Borghare
Rg.No.MH-28-0047569
Dapoli, Ratnagiri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *