दाभोळ : दाभोळ-बुरोंडी गटातून जिल्हा परिषदेसाठी साधना मिहीर महाजन यांनी भरला उमेदवारी अर्ज

banner 468x60

येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, दापोली तालुक्यात आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर दाभोळ–बुरोंडी जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार साधना मिहीर महाजन यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज सादर करण्यावेळी जालगावचे सरपंच आणि भाजपचे युवा नेते अक्षय फाटक यांची विशेष उपस्थिती होती. यासोबतच भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

banner 728x90

साधना मिहीर महाजन या दापोली तालुक्यातील कोळथरे गावच्या रहिवासी असून त्यांनी MSc (Physics) आणि B.Ed असे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. गरीब शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या साधना महाजन यांनी कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून नोकरी करत शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण आणि समाजकार्याची वाट चोखाळत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

साधना मिहीर महाजन यांचा सामाजिक व राजकीय अनुभव :

२०१२ ते २०१९ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय कार्य

महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री म्हणून अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व

२०१६ ते २०१९ : पूर्णवेळ कार्यकर्ती

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची उडान नेतृत्व फेलोशिप प्राप्त

आमदार उमाताई खापरे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून विधान भवन व मंत्रालयातील कामाचा अनुभव

दाभोळ गटातील विविध गावांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करून पूर्ण करण्यात मोलाचे योगदान

विद्यार्थी चळवळीतून त्यांचे सामाजिक व राजकीय घडण झाले असून त्या संघर्षशील नेतृत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व युवकांच्या प्रश्नांवर आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.

सामाजिक व राजकीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव

साधना मिहीर महाजन यांनी २०१२ ते २०१९ या कालावधीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रियपणे काम केले. त्या महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री म्हणून कार्यरत असताना अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले. २०१६ ते २०१९ या कालावधीत त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या.

त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची ‘उडान’ नेतृत्व फेलोशिप प्राप्त झाली असून, त्यातून त्यांनी प्रशासकीय व नेतृत्व कौशल्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी आमदार उमाताई खापरे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून विधान भवन व मंत्रालय स्तरावर काम करत प्रशासकीय अनुभव मिळवला आहे.

दाभोळ–बुरोंडी गटातील विविध गावांमध्ये सुमारे १ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळवून ती पूर्ण करून घेण्यात त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येते. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित कामांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे.

परिवर्तनासाठी निवडणूक लढवत असल्याचा निर्धार

“मी केवळ निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर सामान्य जनतेसाठी परिवर्तन घडवण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे,” असे मत साधना मिहीर महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केले. महिला, युवक, शेतकरी व सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दापोली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करण्याची शक्यता असून, तालुक्यात निवडणूक वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

साधना मिहीर महाजन यांच्या उमेदवारीमुळे दाभोळ–बुरोंडी गटातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या गटाकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, छाननी प्रक्रिया आणि माघारीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *