दाभोळ : अंगणात येऊन शिवीगाळ, किरकोळ वाद तुंबळ हाणामारी

banner 468x60

दापोली तालुक्यातील दाभोळ जवळील आगरवायंगणी बौद्धवाडी येथे दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिल्याने दाभोळ पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना १३ जानेवारी रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास घडली असून,

banner 728x90

या संघर्षात दोन्ही पक्षांतील व्यक्ती जखमी झाल्या आहेत. फिर्यादी प्रवीण गौराजी येलवे (४०) यांच्या म्हणण्यानुसार, यशपाल, स्वप्निल आणि प्रणय महादेव येलवे यांनी कोणतीही सबब नसताना त्यांच्या अंगणात येऊन शिवीगाळ केली. या वादात यशपाल येलवे याने प्रवीण यांच्यावर जांभा दगड भिरकावला, जो त्यांच्या डाव्या डोळ्याच्या वर लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

तसेच स्वप्निल येलवे याने काठीने मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
दुसरीकडे, स्वप्निल महादेव येलवे (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा वाद जुन्या वैमनस्यातून आणि ‘उपाध्यक्ष’ पदाच्या विरोधातून झाला आहे. स्वप्निल यांचा भाऊ प्रणय घरी परतत असताना प्रवीण येलवे, प्रमोद येलवे, मंदार येलवे

आणि अनिल येलवे यांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या स्वप्निल यांनाही आरोपींनी लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दाभोळ पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची दखल घेत एकूण ७ संशयितांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *