चिपळूण : माजी आमदार रमेश कदम यांचा राजीनामा

banner 468x60

चिपळूणमधील राजकीय वर्तुळातून एक राजकीय घडामोड समोर येत आहे.चिपळूणचे माजी आमदार आणि माजी नगराध्यक्ष रमेश कदम यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे

banner 728x90

सादर केला असून त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजीनाम्याबाबत बोलताना कदम यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगराध्यक्ष पदासाठी स्वतः उमेदवार म्हणून पुढे येत आघाडीतील घटक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आले. या संपूर्ण प्रक्रियेत वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


“मी १९८४ पासून शरद पवार साहेबांसोबत काम करत आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी पक्षात सक्रिय आहे. मंडळपासून ते राजापूरपर्यंत पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्षासाठी आवश्यक ते सर्व केले, मात्र सध्या पक्षात कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांना किंमत उरलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीत पक्षात काम करण्याची इच्छाच उरलेली नसल्याचे सांगत रमेश कदम यांनी राष्ट्रवादी

काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *