दापोली : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जेसिआय दापोलीतर्फे युवा उद्योजक विनय शिगवण यांचा गौरव

banner 468x60

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जेसिआय दापोलीच्या वतीने युवा उद्योजक विनय नंदिनी अर्जुन शिगवण (नंदिनी एंटरप्रायझेस) यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. रिअल इस्टेट क्षेत्रातील एक यशस्वी व आत्मनिर्भर उद्योजक म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

banner 728x90

अवघ्या ६ ते ७ वर्षांच्या कालावधीत कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सातत्याच्या जोरावर विनय शिगवण यांनी रिअल इस्टेट व्यवसायात भक्कम स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, आज अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीची दखल घेत जेसिआय दापोलीतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमास जेसिआय दापोलीचे अध्यक्ष Jc डॉ. कुणाल मेहता, सचिव Jc रोशन वेदक, खजिनदार Jc सीए ऋषिकेश शेठ, प्रकल्प संचालक Jc मुकुल नेने, माजी अध्यक्ष JFD सुयोग भगवत, JFD कुणाल मांडलिक, Jc ऋत्विक बापट, उपाध्यक्ष Jc स्वप्नील मेहता, Jc तेजस मेहता तसेच Jc अभिषेक खटावकर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शिगवण यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. युवकांनी मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे युवकांना नवी दिशा व प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *