खेड : एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डायलिसिस युनिटचे उद्घाटन

banner 468x60

घाणेखुंट–लोटे खेड येथील एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि अमनोरा येस्स फाउंडेशन, सिटी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ जानेवारी २०२६ रोजी अत्याधुनिक डायलिसिस युनिटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

banner 728x90


या डायलिसिस युनिटसाठी आवश्यक असलेली ४ डायलिसिस मशिन्स, ४ बेड्स तसेच आर.ओ. (RO) सिस्टीम ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) कंपनीच्या CSR उपक्रमांतर्गत Rotary Club of Pune South व Poona South Rotary Charitable Trust यांच्या माध्यमातून देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमासाठी Rotary Club of Pune South च्या अध्यक्षा Rtn. मनीषा राजेश बेलगावकर तसेच Poona South Rotary Charitable Trust चे Managing Trustee Rtn. विनोद अग्रवाल यांचे मोलाचे योगदान लाभले.


या डायलिसिस युनिटचे उद्घाटन Vinati Organics चे President महादेव महिमान तसेच चिपळूण येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राकेश हसबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या अत्याधुनिक डायलिसिस युनिटमुळे घाणेखुंट–लोटे परिसरासह संपूर्ण खेड, चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्यातील मूत्रपिंड विकाराने ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, सुरक्षित व किफायतशीर उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. यापूर्वी डायलिसिससाठी रुग्णांना दूरच्या शहरांमध्ये जावे लागत होते; मात्र आता ही अत्यावश्यक सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत ग्रामीण व औद्योगिक भागात अशा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उभारल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच Vinati Organics व एम.ई.एस. ए.एम. परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या दरम्यान भविष्यात CSR उपक्रमांतर्गत नवीन आरोग्य विभाग सुरू करण्याची इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन उत्पात, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. अनुपम आलमान, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग, एम.ई.एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कॉलेज ऑफ नर्सिंगचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मान्यवर पाहुणे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *