दापोली तालुक्यातील गावतळे येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या झोलाई देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदिराच्या सभामंडपात लावलेल्या सुमारे १० पितळी घंट्या चोरट्यांनी चोरून नेल्याने भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास लक्षात आली. नेहमीप्रमाणे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आले असता सभामंडपातील घंट्या गायब असल्याचे दिसून आले. याबाबत तातडीने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झोलाई देवीचे मंदिर हे परिसरातील ग्रामदैवत असून येथे नियमित भाविकांची मोठी गर्दी असते. अशा पवित्र ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*