जागेच्या वादातून चुलत्याला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चुलतीलाही ढकलून देउन मारहाण केली. ही घटना बुधवार 7 जानेवारी रोजी रात्री 8.30 वा.सुमारास पेठकिल्ला येथे घडली.
प्रविण मोहन जाधव (25,रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पूतण्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात त्याचे चुलते दिपक नामदेव जाधव (53,रा.पेठकिल्ला,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री प्रविणने चुलते दिपक जाधव यांच्या घरी जाउन मी, जेसीबी लावून घरासमोरचा बांध फोडून टाकून तेथे माझी गाडी उभी करण्यासाठी जागा तयार करणार आहे असे सांगितले. त्यावर चुलत्याने त्याला ‘मी सेपरेट आहे मी सुखात आहे. तुम्ही
व तुमचे भावबंध एकत्र बसून तुमच्या जागेची वाटणी करुन घ्या’ असे सांगितले. याचा प्रविणला राग आल्याने त्याने शिवीगाळ करत ही तूझी जागा कुठे आहे असे बोलून चुलत्याची मान पकडून हातांच्या थापटांनी मारहाण केली. तेव्हा चुलती शोभा जाधव हिने मधे पडून त्यांची सोडवा सोडव केली असता संशयित पुतण्या प्रविण तिथून निघून गेला होता.
दरम्यान,रात्री 8.30 वा.सुमारास प्रविण पुन्हा दारुच्या नशेत चुलत्याच्या घरी गेला. त्यानंतर त्याने चुलत्याला तुम्ही चालते व्हा तुमचे जमिनीचे साताबाराव नाव नाही, तुम्हाला आणि घराला जाळून टाकीन असे बोलून घरासमोरील गेटचा लाकडी दांडका घेउन आला.
तो दांडका त्याने चुलत्याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तेवढ्यात चुलती त्या ठिकाणी आली असता प्रविणने तिलाही ढकलून देउन हातांनी मारहाण करत एक तारखेपर्यंत येथून निघून जा नाहीतर तुम्हाला खल्लास करतो अशी धमकी दिली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













