दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे 2026चे पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा, सलीम रखांगे, तेजस बोरघरे, राधेश लिंगायत,अजित मोरे,सिद्धेश शिगवण, अजित सुर्वे यांना पुरस्कार प्रदान

banner 468x60

दापोली तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहित, विकास आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे देण्यात येणारे २०२६ सालचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण ६ जानेवारी रोजी रामराजे महाविद्यालय, दापोली येथे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात आले.

banner 728x90

या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे सलीम रखांगे, अजित सुर्वे, तेजस बोरघरे, अजित मोरे, सिद्धेश शिगवण आणि राधेश लिंगायत यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष कृपाताई घाग, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा व नगरसेविका साधना बोत्रे, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, रामराजे महाविद्यालयाच्या संचालिका स्मिताली राजपुरे, जालगावचे सरपंच अक्षय फाटक, दशोन्नमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, ज्येष्ठ पत्रकार जगदीश वामकर, प्रसाद रानडे, तालुका संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकण कट्टा न्यूज आणि निवेदिता न्यूजचे पत्रकार सलीम रखांगे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जालगावचे सरपंच व सुप्रसिद्ध उद्योजक अक्षय फाटक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कोकण कट्टाचे संपादक तेजस बोरघरे यांना रामराजे महाविद्यालयाच्या अध्यक्ष स्मिताली राजपुरे व प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दैनिक सकाळचे दापोली प्रतिनिधी राधेश लिंगायत यांना नगराध्यक्ष कृपा घाग यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला.

दैनिक सागरचे पत्रकार अजित मोर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

दैनिक बित्तम बातमीचे पत्रकार सिद्धेश शिगवण यांना आदर्श युवा पत्रकार पुरस्कार डॉ. कुणाल मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पत्रकारितेसोबत सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे दिव्य कोकणचे संपादक अजित सुर्वे यांनाही आदर्श युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास दापोली अर्बन बँकेचे व्यवस्थापक संभाजीराव थोरात, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जगदीश वामकर, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद रानडे, डॉ. प्रशांत परांजपे, कवयित्री रेखा जेगरकल आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार दिनानिमित्त रामराजे महाविद्यालयाच्या वतीने दापोलीतील सर्व पत्रकारांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *