शृंगारतळी : निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का; गौरव वेल्हाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

banner 468x60

गुहागर तालुक्यातील सर्वात मोठा राजकीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगारतळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्दज तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.यामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे.रत्नागिरी पाली येथे हा पक्षप्रवेश पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आला.

banner 728x90

यामध्ये सामाजिक कार्यकर्ते कै. सुशील वेल्हाळ यांचे सुपूत्र गौरव वेल्हाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत हा पक्षप्रवेश घडवून आणला. त्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वागत केले.
शृंगारतळी ही गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी व राजकीय प्रभावक्षेत्र असलेला मुख्य विभाग आहे. येथील राजकीय घडामोडी तालुक्याच्या राजकारणात नेहमीच प्रभाव टाकताना दिसतात. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीला सामोरे जाताना शृंगारतळी विभागाचा राजकीय मतांच्यादृष्टीने प्रथम विचार करावा लागतो.

कै. सुशील वेल्हाळ यांनी आपल्या सामाजिक कार्यातून गुहागर तालुक्यात आपला दबदबा निर्माण केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला कायमस्वरुपी साथ देऊन त्यांनी येथे संघटनात्मक बांधणी व वैयक्तिक संपर्क यावर येथे पक्षाला उर्जितावस्था आणून दिली होती. त्यांच्या पश्चात मुलगा गौरव यानेही त्यांना साथ दिली. आज गौरव वेल्हाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आगामी जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश गौरव वेल्हाळ यांच्यासाठी राजकीय टर्निंग पॉईंट ठरला आहे.


यावेळी प्रशांत भुवड, प्रमोद भुवड, वैभव आदवडे, अजित बेलवलकर, शब्बीर शेख, डॉ. घारे, मुखत्यार भाई, संदीप मांडवकर, दीपक कदम, वैभव वेल्हाळ, नंदकुमार पालकर, पिंट्या वेल्हाळ, अभिजीत वेल्हाळ, सुनील बेंद्रे, गणेश मोरे, आकाश जाधव, सूरज बेंद्रे, राजेंद्र भोजने, अवधूत वेल्हाळ, मोहसीन मालगुंडकर, साहिल वेल्हाळ, प्रीत वेल्हाळ, आर्या वेल्हाळ आदी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *