गुहागर (सचिन कुळये) :रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुहागर तालुक्यातील आदर्श शाळा सडे जांभारी नं. २ ने आपल्या कल्पकतेची मोहोर उमटवली आहे.
‘शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी सौर चाळणी’ या विषयावरील नाविन्यपूर्ण प्रतिकृती सादर करून या शाळेने विद्यार्थी गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला असून,
आता या उपकरणाची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी झाली आहे.विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरणया प्रदर्शनामध्ये निकुंज संजय दावडे, वैष्णवी विजय वेलुंडे आणि ऋषिकेश दिलीप डिंगणकर या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीपणे आपल्या मॉडेलचे सादरीकरण केले.
सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या चाळणीमुळे शेतीकामातील श्रम कमी होण्यास मदत होणार असून, परीक्षकांनी या कल्पनेचे विशेष कौतुक केले.
मार्गदर्शक शिक्षक आणि पाठबळविद्यार्थ्यांच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक संतोष रामचंद्र मुंडेकर यांच्यासह श्री. उदय सखाराम गोरीवले,
श्रीमती पल्लवी पांडुरंग डिंगणकर आणि श्री. विशाल चंद्रकांत पवार या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.गावात आनंदाचे वातावरण शाळेने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे साडे जांभारी गावात आनंदाचे वातावरण आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













