कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या, तुतारी गाड्यांच्या आरक्षणासाठी आधार OTP अनिवार्य

banner 468x60

रेल्वे प्रशासनाने तिकीट प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. २३ डिसेंबर २०२५ पासून निवडक १०० गाड्यांच्या तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ तिकिटांसाठी आधार OTP (Aadhaar OTP) पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

banner 728x90


पत्रात दिलेल्या माहितीनुसार, कोकण मार्गावरील खालील गाड्यांसाठी हा नियम लागू झाला आहे:

कोकण कन्या एक्सप्रेस (२०१११): मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी ही अत्यंत लोकप्रिय गाडी आता आधार OTP प्रणालीच्या कक्षेत आली आहे.

तुतारी एक्सप्रेस (११००३): दादर ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या या गाडीसाठीही प्रवाशांना आता ओटीपी पडताळणी करावी लागेल.

मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (१२६१८): हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम या लांब पल्ल्याच्या आणि कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाडीचाही या यादीत समावेश आहे.

ज्या प्रवाशांना या गाड्यांचे तत्काळ तिकीट काढायचे आहे, त्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करावी. यामुळे तिकीट आरक्षणाच्या वेळी होणारी गैरसोय टाळता येईल असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *