दाभोळ : ए. के. आय. दाभोळचा अहमद बामणे जिल्ह्यात चमकला, अहमदने जिल्हा धनुर्विद्या स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

banner 468x60

जिल्हा धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा (मुले व मुली) सन २०२५ चे भव्य आयोजन एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या स्पर्धा कंपाऊंड, रिकर्व व इंडियन अशा तीन प्रकारांत घेण्यात आल्या.


या स्पर्धेत अंजुमन खैरुल इस्लाम सेमी इंग्लिश हायस्कूल, दाभोळ येथील गुणवंत विद्यार्थी कुमार अहमद बामणे याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशामुळे त्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

banner 728x90


या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फजलुद्दीन जमालुद्दीन बामणे यांनी अहमद बामणे याचे विशेष अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे मार्गदर्शक प्रशिक्षिका मिस. अनामिका रविंद्र आवरे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मेहनत व प्रेरणा तसेच संपूर्ण संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकवृंद व पालकवर्ग यांनीही अहमद बामणे याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचा विश्वास, पाठिंबा आणि प्रोत्साहन यांचे हे यशस्वी फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

ए. के. आय. दाभोळच्या यशस्वी परंपरेत कुमार अहमद बामणे यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आणखी एक सुवर्णाक्षरांनी नोंद झाली असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *