गुहागर : शहरात एसटी आणि चारचाकी अपघात

banner 468x60

गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले.

🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सदर अपघातानंतर चारचाकीच्या मालकाने एस.टी.ला नुकसाभरपाई देवून प्रकरणावर पडदा टाकला.

त्यामुळे पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झालेली नाही. बुधवारी (ता. 21) दुपारी अनिल कृष्णा कदम आपल्या मालकीची चारचाकी (एम.एच.06 टी 6033 घेवून गुहागरकडून रानवीकडे जात होते.

तर पिंपळवट गुहागर ही एस.टी. (क्र. एमएच 14 बी.टी.1586 ) आरेगावातून गुहागरच्या दिशेने येत होती. दोन्ही वहाने वरचापाट येथील तीव्र वळणात असताना चुकीच्या बाजुने

आलेल्या अनिल कदम यांच्या वाहनाने एस.टी.ला धडक दिली. चुकीच्या दिशेने येणारी चारचाकी आपल्या एस.टी.वर आदळणार हे

एस.टी. चालक देवरूखकर यांनी एस.टी. बाजुला घेवून थांबवली त्यामुळे धडकेची भिषणता खूप कमी झाली. यावेळी एस.टी.मध्ये प्रवासी व विद्यार्थी होते. सदर अपघातात दोन्ही वाहनांमधील कोणीही जखमी झाले नाही.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *